श्री सिद्धिविनायक मंदिर ११ डिसेंबर पासून पाच दिवस बंद राहणार

0

मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर बुधवारपासून 5 दिवस बंद असणार आहे. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षीप्रमाणे माघ श्री गणेश जयंतीपूर्वी ‘श्रीं’चे सिंदूरलेपन केले जाते. त्यानुसार या वर्षी बुधवारपासून (ता. ११) रविवारपर्यंत (ता. १५) ही विधी करण्यात येणार आहे. या काळात भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद असणार आहे. श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अगदी जगभरातून भाविक येत असतात. परंतु, आता बुधवारपासून ५ दिवस सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार नाही. श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दररोज अनेक भाविक येतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणूनच येणाऱ्या सगळ्या भाविकांनी या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती मंदिरातल्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांना केली आहे.

या काळात मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद राहणार आहे.परंतु, भाविकांना गाभाऱ्याबाहेरून श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन दिले जाणार आहे. या कालावधीत मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेवर होतील. सोमवारी (ता. १६) गाभाऱ्यात स्थलशुद्धीसाठी उदकशांत व प्रोक्षण विधी होणार आहे. सोमवार, दिनांक 16 डिसेंबर 2024 या दिवशी गाभाऱ्यामध्ये स्थलशुद्धी प्रीत्यर्थ उदकशांत आणि प्रोक्षण विधी हा धार्मिक विधी होईल. त्यानंतर श्रींची महापूजा, नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजल्या पासून भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन दिले जाईल. तसेच, श्री मारुतीचेदेखील प्रतिवर्षाप्रमाणे सिंदूरलेपन करण्यात येते, त्यामुळे या कालावधीत श्री मारुतीचे दर्शनही बंद राहणार आहे. सोमवारी पहाटे भाविकांना श्री मारुतीचे दर्शन दिले जाणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech