भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई : भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. या धमकीमुळे राजकीय वर्तुळाच खळबळ उडाली आहे. कारण, सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख आमदारांना अशारितीने धमकी येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनीष निकोसे नावाच्या इसमाने आमदार लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीविरोधात या प्रकरणी प्रसाद लाड यांनी पोलिसात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, प्रसाद लाड हे भाजपचे प्रमुख आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे, लाड यांना धमकी देण्यामागे नेकमं काय कारण आहे, त्यांना खरंच धमकी कोणी आणि का दिली, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

धमकी देणारा हा व्यक्ती आपण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलतोय, तर कधी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत आहे. सदर इसमाची कसून चौकशी करून त्याच्यावर धमकीचा गुन्हा दाखल करावा व त्यास अटक करावी, अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीतून केली आहे. माहितीनुसार मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीकडून आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. रीतसर तक्रार दाखल केल्यानांतर देखील मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने आमदार लाड यांना आज पुन्हा एकदा धमकी दिल्याची माहिती आहे. २ हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन, असे या धमकीत म्हटले आहे.याप्रकरणी या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तसेच त्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech