कोल्हापूर : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे इंडी आघाडीतील काही पक्ष काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नुकतेच या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांनी इंडी आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी मिळण्याबाबत एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते. ममता बॅनर्जी या देशाच्या एक प्रभावी नेत्या आहेत. त्यांच्याकडे इंडी आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. ते शनिवारी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
विरोधी पक्ष प्रभावी बनू नये याची खबरदारी घेतली जात आहे. पण लोकांमध्ये तसं चित्र नाही. लोकांमध्ये उत्साह नाही. लोकांना ते अभिप्रेत नाही. कोणताही उत्साह नाही. आमच्याकडे सत्ता असो वा नसो. संसदीय अधिकार असो वा नसो. आम्ही जागरूक राहणार. लोकांमध्ये राहणार. पवारांनी म्हटलं आहे की, आज देशाच्या संसदेत त्यांनी जे लोक निवडून पाठवलेत ते अतिशय कर्तबगार, कष्टाळू आणि जागरूक आहेत. त्यामुळे त्यांना तसं म्हणण्याचा अधिकार आहे.